रक्तदानापेक्षा श्रेष्ठ कोणतेही दान नाही – आ.चिमणराव पाटील. -पारोळा येथे श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे रक्तदान शिबिर,५७ दात्यांचे रक्तदान.

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा – सध्याचा धावपळीचा जीवनात अनेक बरे वाईट प्रसंग येतात,ब्लड कॅन्सर,अपघातग्रस्त आदी रूग्णांना रक्ताची नितांत गरज असुन रक्तामुळे अनेक रूग्णांना जिवदान मिळते म्हणून रक्तदाना पेक्षा श्रेष्ठ कोणतेही दान नाही असे मत आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त केले.
पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दि १६ रोजी शुक्रवारी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे आयोजीत रक्तदान शिबिरात ते बोलत होते.यावेळी शिबिरात ५७ दात्यांनी रक्तदान केले.
शिबिरास माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी ही भेट देत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगीतले तसेच संस्थानाकडून पारोळा शहर व तालुक्यासाठी मिळालेली विनाशुल्क रुग्णवाहिके विषयी माहिती जाणुन घेत रुग्णवाहिका अपघातग्रस्तांना जीवनदायिनी ठरत असल्याने तिचे विशेष कौतुक करून संस्थांनास ५ हजार रुपये रोख देणगी स्वरूपात दिले.
माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, आरोग्यानायक संभाजीराजे पाटील,शितल अकॅडमी चे संचालक रविंद्र पाटील,मुंदाने सरपंच एकनाथ पाटील,मुंदाने पोलिस पाटील मनोहर पाटील, पत्रकार रमेशकुमार जैन,योगेश पाटील,दिलीप सोनार, अशोककुमार लालवाणी यांनी ही शिबिरास भेट दिली.सकाळी ८ ते ५ या वेळेत घेण्यात आलेल्या या शिबिरात ५७ दात्यांनी रक्तदान करून मोलाचे सहकार्य केले. रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.रक्त संकलन जिवन ज्योती ब्लड सेंटर, धुळे यांनी केले.जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेस पूजन करून कार्यक्रमाची सुरवात व सांगता झाली.
शिबिर यशस्वीतेसाठी भगवान चौधरी,प्रकाश पाटील,दत्तात्रय बागुल,खुशाल पाटील,ईशान भालेराव,महेश साळी,राजेंद्र शिंपी,धनराज खैरनार,रूपेश क्षत्रिय,शुभम गव्हाणे,किरण कासार,अनिता पाटील,रोहिणी साळी,सुनिता पाटील,मनिषा पाटील,रेखाबाई पाटील,जैन्याबाई पाटील,अल्काबाई पाटील यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान राज्यात सिकलसेल अनेमिया,हिमोफिलिया, थॅलेसेमिआ,ब्लड कॅन्सर यासह अपघातग्रस्तांसाठी वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते.त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्त बाटल्या देण्याचे संप्रदायामार्फत निश्चित केले आहे.सहा राज्यांत १० ते २५ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या संस्थानाचा या रक्तदान शिबिर उपक्रमास भक्तगणांसह इतरांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.