लोकसभेआधीच राजकीय राडे सुरू!अजित पवार vs जितेंद्र आव्हाड.. – एकमेकांवर राजकीय चिखलफेक.

–
वरिष्ठांनी सांगितलेल्या नेत्याला अध्यक्ष केला असता तर पक्ष चांगला. आम्ही अध्यक्ष झालो म्हणजे निव्वळ बेकार, यांनी पक्ष चोरला असे म्हणता. अरे निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. आम्ही आमची बाजू मांडली होती. प्रतोदच आमच्या बाजूने आहेत. मग उगीच आमची बदनामी का करता. वरिष्ठांच्या म्हणजे शरद पवारांच्या पोटी जन्माला आलो असतो, तर आम्हाला अध्यक्षपद मिळाले असते, पक्ष माझ्या ताब्यातच आला असता. तुमच्या सख्ख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना? मग मी त्यांच्या पोटी जन्माला आलो नाही हे आमचे दुर्दैव, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी बारामतीत भाषण करताना पुन्हा
एकदा आपले काका शरद पवार याच्यावर हल्लाबोल केला. – त्यांच्या भावाचा मुलगा होतास म्हणून माफ केलं-आव्हाड
तुम्हाला चार वेळा जे उपमुख्यमंत्रीपद मिळालं ते केवळ शरद पवार यांच्यामुळे मिळाले. याचा मनात उपकार तर ठेवा. कृतज्ञता तर व्यक्त करा. इतका कृतघ्न माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात जन्मलेलाच नाही. परत त्याला रक्ताचं नातं जोडायचं? मी तुमच्या भावाचा मुलगा होतो ना? अरे तुम्ही त्यांच्या भावाचा मुलगा होतास म्हणूनच उपमुख्यमंत्री झालात. त्यांच्या भावाचा मुलगा होतात म्हणूनच माफ केले. हे सगळं बोलायलाही वाईट वाटतं. एवढी वर्ष एकत्र काम केलं, पण एवढं वर्षे काम करूनही या माणसाला शरद पवारांची ओळख पटली नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.