आम्ही विचारधारा बदललेली नाही! अजित पवार…

24 प्राईम न्यूज 19 Feb 2024. मुस्लीम समाज हा देशाचा अविभाज्य घटक आहे. देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात मुस्लीम समाजाचादेखील मोठा वाटा आहे, पण काही जण मुस्लीम समाजामध्ये भीतीचे वातावरण तयार करून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. पूर्वग्रहदूषितपणा बाजूला ठेवून आपण एकत्र यायला पाहिजे. काही जण म्हणतात की, आम्ही विचारधारा बदलली आहे, पण आम्ही अजून आमची विचारधारा बदललेली नाही. महाराष्ट्रामध्ये कोणावरच अन्याय होऊ देणार नाही. राज्यात सर्वच जण सुरक्षित राहतील, असे आश्वासन उपमुख्यमत्री अजित पवार यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) अल्पसंख्याक विभागाकडून शिक्षण, आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर राज्यस्तरीय अल्पसंख्याक विश्वास मेळावा वाशीतील सिडको एक्झिबेशन सेंटरमध्ये रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.