छत्रपती शिवरायांचे विचार आजच्या तरुणांपर्यंत पोहोचविण्याची गरज- -प्रकाशभाई पाटील

0

अमळनेर/प्रतिनिधि
छत्रपती शिवरायांचे विचार आजच्या तरुणांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे मत झाडी ता.अमळनेर येथील रहिवासी सध्या सुरत येथे वास्तव्यास असलेले  मत प्रकाशभाई पाटील(निवृत्त ATS अधिकारी सुरत,गुजरात) यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
आज छत्रपती शिवरायांची जयंती असून त्याबाबत मत व्यक्त करतांना प्रकाशभाई म्हणाले की,शतकानू शतके मुघलांच्या जुलमी सत्तेच्या टाचेखाली दबलेल्या हिंदू आणि मराठी माणसाला जगण्याची उर्मी देऊन लढण्याचे बळ देणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराष्ट्रात अठरापगड जातींसह मुस्लिम मावळ्यांना एकत्र आणून स्वराज्याचा पाया रचला. स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि  स्वप्न सत्यात आणून दाखवले. अखंड हिंदुस्थानात  प्राणाची बाजी लावणारा आणि औरंगजेबाच्या कचाट्यातून गनिमी काव्यातून सुटलेला  या राज्याने  स्वराज्य निर्माण केले. खरे रयतेच्या, जनतेच्या मनातले सुराज्य निर्माण करणारा शेतकऱ्याच्या हिताचं रक्षण करणारा, महिलांना सन्मान देणारा, सर्व धर्म समभाव जपणारा एकमेव  मराठी मुलूखाला मिळाला हिंदू राजा छत्रपती म्हणून रयतेला मिळाला. या  युगप्रवर्तक घटनेला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत.                                               याच पार्श्वभूमीवर या छत्रपती शिवरायांच्या विचारांचे आचरण करून आपल्या कृतीत व देशातील तरुणांचे कृतीत हे विचार रुजविण्यासाठी सतत तालुक्यात धडपड करण्याची गरज आहे.  प्रकाश आर पाटील (झाडी) यांनी मत व्यक्त केले. तसेच  नियमित तरुणांनी शिवरायांच्या विचारांशी प्रेरित राहून तरुणांसाठी  व्यसनमुक्ती सोडून व्यायाम, मल्ल कुस्ती असे खेळांकडे वळावे जेणेकरून तरुणाई व्यसनापासून आपोआप दूर होऊन जाईल. यासाठी जागृतीही प्रकाशभाई हे तरुणांमध्ये करत असतात. तर तरुणांनो चला ,छत्रपतींचे सुराज्य वृद्धिंगत करण्यासाठी एकत्र येऊन कठोर परिश्रम करण्याची शपथ घेऊया ! युवकांच्या या देशाला जग कवेत घेणे इतकं समर्थ बनवूया. असे मत प्रकाशभाई यांनी पत्रकातून व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!