मराठा आरक्षणाचा फैसला आज..

24 प्राईम न्यूज 20 Feb 2024. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला अखेर कितपत यश मिळणार, हे मंगळवारी मराठा आरक्षणासंदर्भात बोलावण्यात आलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात ठरणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी विशेष कायदा करण्यात येणार असून मराठा समाजाला १० ते १३ टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता आहे त्यामुळेच राज्यातील मराठा समाजासाठी मंगळवारचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. इतकी वर्षे चाललेल्या या लढ्याला विधीमंडळात न्याय मिळणार आहे. मराठा समाजातील तरुण-तरुणींचे स्वप्न साकार करणारा हा दिवस असणार आहे. त्यामुळे राज्यातील संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष या विशेष अधिवेशनाकडे लागले आहे.