संगणक परिचालकांचे मासिक मानधन १० हजार.. – एकनाथ शिंदे

राज्यातील ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा सुमारे २० हजार संगणक परिचालकांकडून सातत्याने होणारी मानधनवाढीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य करत दरमहा किमान ३ हजार वाढ देण्याचे निर्देश ग्रामाविकास विभागाला दिले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी १ फेब्रुवारी रोजी जो संगणक परिचालक कंझ्युमेबल (पेपर रिम, प्रिंटर, टोणर इ.) चा खर्च स्वतः करेल, त्याला कंझ्युमेबलमधील रक्कम मानधन म्हणून वाढवण्याचा ‘सीएससी-एसपीव्ही’च्या सहमतीने विचार करा या पर्यायाला सहमती दर्शवली आहे. त्यानुसार कंझ्युमेबलसाठी ‘सीएससी-एसपीव्ही कंपनीला प्रति केंद्र प्रति महिना अदा करण्यात येणारे किमान २,७०० रुपये ते कमाल ३००० रूपये यापुढे संगणक परिचालकांना अदा करण्यासाठी सहमती देण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने सीएससीला दिले आहेत.
खासगी कंपनीला प्रशिक्षणासाठी प्रति केंद्र मासिक १३०० रुपये देण्यात येतात. या रकमेतील जास्तीत जास्त रक्कम संगणक परिचालकांच्या मानधनासाठी उपयोगात आणण्यासाठी कंपनीसोबत बोलणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आहेत. या निर्णयामुळे संगणक परिचालकांचे मासिक मानधन आता ७ हजारांवरून १० हजार होणार असून याचा ग्रामीण भागातील २० हजार कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे.