राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नवा पक्ष.. -शरद पवार गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश

24 प्राईम न्यूज 20 Feb 2024
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला दिलेले नाव निवडणूक आयोगाने पुढील आदेशांपर्यंत कायम ठेवावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले. शरद पवार गटाच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला पुढील ७ दिवसांत शरद पवार गटाला निवडणूक चिन्ह देण्याचेही निर्देश दिले. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलेले ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ हे नाव सुप्रीम कोर्टाच्या पुढील आदेशांपर्यंत कायम राहणार आहे.
शरद पवार गटाने चिन्हासाठी रितसर आयोगाकडे अर्ज करावा, आयोगाने मागणीनंतर त्यांना एक आठवड्यात चिन्ह द्यावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती सूर्यकांत, दीपांकर दत्ता आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. “मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंगळवारी विशेष अधिवेशन होणार आहे.