शिवशंभु प्रतिष्ठानतर्फेशिवजन्मोत्सव पालखी सोहळा..

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा – शहरात छ्त्रपती शिवशंभु प्रतिष्ठानतर्फे गेल्या दोन वर्षांपासून साप्ताहिक शिव अभिषेक व महापुरुषांचा जयंती, पुण्यतिथी सह विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.त्या पार्श्वभूमीवर या वर्षापासून छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान पारोळाच्या वतीने अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य पालखी मिरवणुक सोहळा आयोजीत करण्यात आला होता.प्रारंभी मोठे श्रीराम मंदिरात पालखीचे पूजन, माल्यार्पण व आरती करण्यात आली.जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील,माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील,मा.नगराध्यक्ष गोविंद शिरोळे,श्री साई हॉस्पिटलचे संचालक डॉ संभाजीराजे पाटील,साहेबराव पाटील,प्रकाश पाटील,अमृत चौधरी,रवि मराठे,विनोद खाडे, विलास वाघ,दिलीप पाटील,डॉ शांताराम पाटील,सचिन पाटील, सौ किरण चंद्रकांत पाटील,ॲड. कृतीका आफ्रे,नगरसेविका रेखाताई चौधरी आदी मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून पालखी सोहळा मिरवणुकीस सुरुवात झाली.सोहळ्यात दुर्गा शौर्य संघ पारोळा व छ्त्रपती शिवशंभु प्रतिष्ठानचे शिवकन्या, शिवभक्त यांनी दंड प्रात्यक्षिक व लेझीम सादरीकरण केले. मिरवणूक राम मंदिर चौक येथून काढून कासार गणपती मंदिर,रथ चौक,नगरपालिका चौक मार्गाने शिवतीर्थावर पोलीस निरीक्षक सुनिल पवार,उपनिरीक्षक राजू जाधव,उपनिरीक्षक अमरसिंग वसावे उपनिरीक्षक गंभीर शिंदे यांच्या हस्ते छ्त्रपती शिवाजी महाराजांची पुजा,आरती ने सांगता करण्यात आली.याप्रसंगी राम मंदिर ते छ्त्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवतीर्थापर्यंत पालखी सोहळा परंपरा हा कायम राहणार असल्याचे छ्त्रपती शिवशंभु प्रतिष्ठानचे सदस्य व शिव भक्तांनीं सांगितलें.दरम्यान पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत सहकार्य केले.