शेतकऱ्यांचा संघटीत होऊन विकास साध्य – -सुनील देवरे.

0

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील

पारोळा सध्या शेतकरी अनेक समस्यांनी ग्रासला आहे,त्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन कार्य केले तरच विकास साध्य होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी केले.

दि.१९ फेब्रुवारी रोजी सोमवारी शिवजयंती व संघटनेचा दुसरा वर्धापन दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील,पत्रकार भुपेंद्र मराठे, अशोक लालवाणी,योगेश पाटील, दिलीप सोनार,विशाल महाजन, राकेश शिंदे,प्रकाश पाटील,माजी नगरसेवक प्रकाश महाजन आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले की,संघटना ही छत्रपती शिवरायांचा विचारांवर चालते,म्हणूनच महाराष्ट्र शेतकरी संघटनेची १९ फेब्रुवारी २०२२ रोजी स्थापना केली.दरम्यान, आमची पुर्ण टिम हि शेतकरी हितासाठी काम करत असुन शासनाच्या अटल भुजल योजनेच्या माध्यमातून १४ ते १८ लाख सबसिडीसाठी २३८ शेतकऱ्यांची नावे नोंदणी करण्यात आली.सोबतच संघटनेमार्फत महिंलांना घरी बसून उद्योग मिळावा म्हणून येणाऱ्या पंधरा दिवसांच्या आत महिला आघाडीचा महिंलांना गारमेंट मेकिंग उद्योग उभारणी करणार असल्याची घोषणा केली.
जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील यांनी शेतकरी नेते सुनील देवरे यांनी दोन वर्षापुर्वी लावलेले रोपटे आता विशाल वटवृक्षात रूपांतर करत आहे असे सांगितले.पत्रकार भुपेंद्र मराठे यांनी संघटना बळकटीसाठी व छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श घेत शेती उपयोगी कार्य करावे असे सांगितले.कार्यक्रमात सारवे,शिरसोदे,वराड या गावात नवीन शाखा स्थापना तर एरंडोल तालुका कार्यकारणी,सल्लागार व समिती अध्यक्षांची निवड करण्यात आली.दरम्यान, कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा कल्याणी देवरे,पारोळा युवती अध्यक्षा कुसुम बाविस्कर, पारोळा तालुकाध्यक्ष डॉ.विनोद चौधरी,भडगाव तालुकाध्यक्ष अभिमन हाटकर,मार्गदर्शक सुभाष पवार,धरणगाव तालुकाध्यक्ष संजय चव्हाण, एरंडोल तालुकाध्यक्ष पी जी पाटील,सल्लागार सुर्यकांत पाटील यांचे सह शाखा प्रमुख, महिला शाखाध्यक्ष,युवती शाखाध्यक्ष व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!