ही मराठ्यांची फसवणूकच-मनोज पाटील

24 प्राईम न्यूज 21 Feb 2024. सगे सोययाच्या अधि सूचना ची अंमलबजावणी करा, अशी कोट्यवधी मराठ्यांची सरकारकडे मागणी आहे. ही मागणी बाजूला सारून स्वतंत्र संवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय आहे. सगेसोयऱ्यांचा कायदाच करायचा नव्हता तर अधिसूचना काढलीच कशाला, ही फसवणूक नाही तर काय, असा सवाल मनोज जरांगे- पाटील यांनी मंगळवारी राज्य सरकारला उद्देशून केला. आमची हक्काच्या ओबीसीमधील आरक्षणाची मागणी आहे. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे यावर आम्ही ठाम आहोत, असेही जरांगेंनी स्पष्ट केले.