आजपासून बारावीची परीक्षा.

24 प्राईम न्यूज 21 Feb 2024
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून (बुधवार) सुरू होणार आहे. परीक्षेसाठी एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे, तर महामुंबईत ३ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देतील बारावीची परीक्षा आज, २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. त्यानुसार दोन्ही इयत्तांच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे दहावी-बारावीच्या परीक्षेत दरवर्षी कॉपी केसेस, बोगस विद्यार्थी सापडणे, समूहकॉपी, पेपर व्हायरल होणे, असे प्रकार सर्रास घडताना दिसतात यंदा मात्र राज्य मंडळ गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणार आहे त्यासाठी राज्य मंडळाकडून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर यंदा देखील परीक्षेत विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अतिरिक्त दिली जाणार आहेत.