तालुक्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात आठ जण जखमी.

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात आठ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली.
येथील राष्ट्रीय महामार्गावर वीचखेडे जवळ दुपारी बाराच्या सुमारास दोन मोटरसायकलिंची धडक होऊन अपघात झाला, त्यात सुनील आनंदा सोमवंशी, नारायण रामदास पाटिल,ललिता सुनील सोमवंशी सर्व राहणार बाळद (पाचोरा) तर विनोद जाधव,कार्तिक जाधव दोघेही राहणार बोळे तांडा (पारोळा) असे पाच जण जखमी झाले.
तसेच अमळनेर रस्त्यावरील तपोवन जवळ रात्री नऊचा सुमारास मोटरसायकलने बैलगाड्यास धडक दिल्याने त्यात
साहिल संग्राम पाटिल (२४), अविनाश झीपरू पाटील (२२), ज्ञानेश्वर नारायण पाटील (३०) सर्व राहणार फरकांडे ता.एरंडोल हे जखमी झाले.त्यांना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचा रुग्णवाहिकेने पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. याबाबत पोलिसात उशीरापर्यंत कुठलीही नोंद नव्हती.