दोन मोटर सायकलींचा अपघात ; १ मृत,१ गंभीर..

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा येथील महामार्गावरील कड़जी गावाजवळ दोन मोटर सायकलींची धडक होऊन त्यात १ जण मृत तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली.
तालुक्यातील कडजी गावाजवळ दि २३ रोजी शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन त्यात हरि सजन पाटोडे,भाऊसाहेब रामचंद पाटोडे दोघे रा मुंदाणे तर अमोल कोळी रा बोळे (ता पारोळा) हे जखमी झाले,त्यांना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेने पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता त्यातील हरी पाटोडे यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर जखमी अमोल कोळी यास धुळे येथे रवाना करण्यात आले.याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.