बजमे फरोग अडावद तर्फे जळगावचे अन्वर खान सन्मानित..

अडावद (प्रतिनिधि) बजमे फरोग एज्युकेशन ट्रस्ट अडावद तर्फे राष्ट्रीय पातळीवरील मुशायराचे आयोजन उर्दू शाळा अडावद येथे करण्यात आले होते या कार्यक्रमात जळगाव सिकलगर बिरादरीचे तथा ए यू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अन्वरखान उस्मान खान शिकलगार यांचा ते करीत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ट्रस्ट तर्फे विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कारा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी फजलूल अब्दुल रउफ यांनी त्यांना स्मृतीचिन्ह तर हाजी जाहीर खान यांनी शाल, अश्फाक मलिक यांनी बुके तर एजाज कबीर यांनी सन्मान पत्र देऊन गौरव केला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष मजहर खान, इदगाह सोसायटीचे सहसचिव अनिस शाह व रागिब शेख आदींची उपस्थिती होती.