अमळनेर पालिकेची धडक कारवाई 14 दुकाने व 20 नळ कनेक्शन धारकावर कारवाई

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर पालिकेने मार्च अखेर कराची थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली त्या साठी सहा कर्मचाऱ्यांचे भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने गुरुवार पासून थकबाकीदरांवर कारवाई सुरू केली आहे. पहील्याच दिवशी थकाकीदारांचे 20 नळ कनेक्शन बंद केले तसेच 14 गाळे सिल केलें आहे मार्च अखेर 20 कोटी थकबाकी वसुलीसाठी हि वसूली मोहीम सुरु केली आहे थकबाकी वसूल ची टक्केवरी वाढवण्यासाठी पालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. महावितरण चे गांधली, जलोद व कलाली, येथीलपाणी पुरवठ्याचे थकित वीज बिल, निवृत कर्मचाऱ्यांची ग्रेजुईटी, वाढीव पाणी पुरवठा योजनेचे कर्ज शासनाच्या इतर रकमा देने बाकी आहेत शासनाचे वसुलीची टक्केववारी वाढवण्यासाठी सारखे आदेश देण्यात येत आहे मोठ्या प्रमाणावर घरपट्टी, पाणीपट्टी, व दुकान भाड्याची थकित रक्कम भरलेली नाहीं त्यांचे नळ कनेक्शन बंद करणे, जप्तीची कारवाई करणे, व्यापारी संकुलास, सिल लावण्याचे काम मुख्याधकरी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाने आणि उपअधिकारी संदीप गायकवाड कर निरिक्षक जगदीश परमार यांचा उपस्थितीत व कर्मचाऱ्यांच्या मदतीने पार पाडली. यात 20 जणांचे नळ
कनेक्शन बंद करण्यात आले लालबहादुर शास्त्री, तिरंगा चौक, स्वामी विवेकानंद, शापिंग, कुंटे रोड, आदी ठिकाणची 14 दुकाने सिल करण्यात आली आहे.