सर्वांना संपवून भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचेय का?- रामदास कदम.


24 प्राईम न्यूज 3 Mar 2024. सर्वांना संपवून भाजपला एकट्याला जिवंत राहायचे आहे का, सा संतप्त सवाल माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी विचारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपची आहे, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर कदम यांनी संताप व्यक्त करत, तुम्ही रायगड आणि रत्नागिरीच्या जागेवरदेखील दावा सांगितला आहे, पण रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा विद्यमान खासदार हा शिवसेनेचा आहे. त्यामुळे सगळ्या पक्षांना संपवून भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचे आहे का? असा सवाल केला. आपण दोघे भाऊ-भाऊ तुझे आहे ते वाटून खाऊ, पण माझ्या खाऊला हात नको लावू. कोणत्याही परिस्थितीत शिवसेना रत्नागिरी-सिंधुदुर्गाची जागा सोडणार नाही. कारण ती जागा आमच्या हक्काची आहे, असे रामदास कदम यांनी भाजपला सुनावले आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामदास कदम यांचे हे वैयक्तिक मत आहे. हे महायुतीचे मत नाही. याबाबत मुख्यमंत्री शिंदेच निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे.