महागाईपासून दिलासा देण्यासाठी भारत तांदूळ केंद्राचे अमळनेर शहरात झाले थाटात उद्घाटन. -उदघाट्नाच्या पहिल्याच दिवशी एकूण 10 किलोच्या 342 बॅग झाल्या विक्री..

0

अमळनेर/प्रतिनिधी. केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सुरू केलेल्या भारत तांदुळच्या अमळनेर केंद्राचे थाटात उदघाट्न करण्यात आले. उदघाट्नच्या पहिल्याच दिवशी एकूण 10 किलोच्या च्या 342 बॅग विक्री झाल्या. लक्ष्मी फूड प्रोसेसर्सतर्फे हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

देशात महागाई वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत आहेत. त्यातही देशात तांदळाच्या किरकोळ किंमतीत वाढ होत आहे. त्यामुळेच आता केंद्र सरकारकडून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र शासन देशात भरात तांदूळ आणणार आहे.
देशातील वाढत्या महागाईच्या काळात सरकारने नागरिकांसाठी हा निर्णय घेतला आहे.
या केंद्रातून आता सर्वसामान्यांना २९ रुपये किलो दराने तांदूळ खरेदी करता येणार आहे. याचे उद्घाटन तिरंगा चौक बालेमिया जवळ माजी नगराध्यक्षा तथा जीप सदस्या जयश्री अनिल पाटील व बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, बाजार समितीचे संचालक प्रकाश अमृतकार व महेंद्र बोरसे, विजय शेकनाथ पाटील,गौरव पाटील, देविदास देसले यांच्या हस्ते उदघाट्न करण्यात आले.
यावेळी नंदू वाणी, प्रदीप डेरे,सचिन पाटील, अथर्व डेरे, बंटी पाटील, मिलिंद डेरे, रवि पाटील, प्रविण डेरे, गणेश वाणी, सुरेश पाटील, तसेच त्रिवेणी महिला मंडळा सह असंख्य महिला विमल डेरे, निता डेरे, अलका डेरे, संगिता डेरे, हे उपस्थित होते.

राजहंस चौक पवन चौकाजवळ विक्री केंद्र

या नंतर राजहंस चौक पवन चौकजवळ ह्या भारत तांदूळची नियमित विक्री सुरु राहणार आहे. त्यात तांदूळ २९ रुपये प्रति किलो दराने विकला जाणार आहे. हा अनुदानित तांदूळ  १० किलोंच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना कमी किंमतीत चांगला तांदूळ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!