शिवरात्री व महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा येथील सद्गुरू महिला उद्योग आणि भोले विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्तं विद्यमाने महिलांसाठी शिवरात्री व महिला दिनानिमित्त स्वयं रोजगार मार्गदर्शनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर,संस्कृतिक कार्यक्रम, हिरकणी सन्मानपत्र (पुरस्कार) व बक्षीस वितरण तसेच महाशिवरात्री निमित्त साबुदाणा खिचडी वाटप असे दिवसभर कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.दरम्यान,सकाळी १० ते १ आरोग्य शिबीर घेण्यात येईल, त्यानंतर १ ते ५ या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतील.यावेळी कार्यक्रमात सहभागी महिलांना स्वयंरोजगार मार्गदर्शन करण्यात येणार असुन शासकीय योजनेसंदर्भात देखील अधिकारी वर्ग सविस्तर माहिती देणार आहेत,याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.