रोहित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, ’22 आमदार अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे येणार.

24 प्राईम न्यूज 7 Mar 2024
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सर्वात मोठा दावा केला आहे अजित पवार गटातील तब्बल 22 आमदार हे पुन्हा एकदा शरद पवारांच्या गटात येणार आहेत, असा मोठा दावा रोहित पवारांनी केला आहे.: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही दिग्गज नेते सध्या एकमेकांच्या विरोधात आहेत. अजित पवार यांच्याकडे जास्त आमदारांचं बहुमत आहेत. तर शरद पवार यांच्याकडे फार कमी आमदारांचा पाठिंबा आहे. असं असताना शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि पवार कुटुंबात कोणतीही फूट पडलेली नाही, असं वक्तव्य केलं आहे. त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. आगामी लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर अजित पवार गटात गेलेले राष्ट्रवादीचे 22 आमदार परत शरद पवारांकडे येतील, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रोहित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देत असताना याबाबत गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे काहीतरी मोठं घडतंय याचे स्पष्ट संकेत मिळताना दिसत आहेत