अमळनेर तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक गावाला जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार.

अमळनेर /प्रतिनिधी. अमृत भारत महाआवास अभियान ग्रामीण २०२२-२३ अंतर्गत राज्यपुरस्कृत आवास योजना ग्रामीण मध्ये अमळनेर तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक गावाला जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजना व राज्यपुरस्कृत आवास योजनांची प्रभावी अमलबाजवणी करण्यासाठी १०० दिवसांचे अमृत महाआवास अभियान राबविण्यात आले होते. यात उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत समिती व ग्रामपंचायतींना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी , प्रकल्प संचालक राजेश लोखंडे ,मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबूलाल पाटील , उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन कुडचे , महिला बालकल्याण अधिकारी राऊत , गटविकास अधिकारी सुशांत पाटील , सरपंच केदारसिंग पाटील ,ग्रामसेवक प्रमिला तायडे , ग्रामीण गृहनिर्माण अभियंता तेजस वाघ , डेटा एन्ट्री ऑपरेटर घनश्याम ठाकरे हजर होते.
राज्यपुरस्कृत आवास योजनेत कानळदा (ता जळगाव) ग्रामपंचायत द्वितीय तर चिंचोली (ता यावल ) ग्राप तृतीय आली आहे. तर प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून प्रथम क्रमांक जामनेर , द्वितीय यावल व तृतीय क्रमांक बोदवड पंचायत समितीने मिळवला आहे. राज्यपुरस्कृत आवास योजनेत देखील जामनेर पंचायत समितीने पहिला क्रमांक मिळवला आहे. द्वितीय क्रमांक धरणगाव तर तृतीय क्रमांक भुसावळ ने मिळवला आहे. पंतप्रधान आवास (ग्रामीण )योजनेत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम क्रमांक मोरगाव ता जामनेर ,द्वितीय पुरस्कार देवगाव ता पारोळा तर तृतीय पुरस्कार खेडगाव ता एरंडोल ग्रामपंचायतीने मिळवला आहे.