शेतकरी संघटनेचे महिला पदाधिकारींसाठी स्वयं रोजगार निर्मिती प्रकल्प..

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा शेतकऱ्यांच्या घरात शेती व्यतिरिक्त इतर माध्यमातून उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संघटनेच्या महिला पदाधिकारींकरीता रोजगार व स्वयं रोजगार निर्मिती प्रकल्पाची सुरुवात संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी नेते सुनील देवरे यांनी महाशिवरात्री व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत करण्याचे योजिले आहे. सदर रोजगार प्रकल्पाचे उद्घाटन शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या हस्ते दिनांक ८ रोजी सकाळी ११ वाजता म्हसवे शिवारातील ओम शांती नगर (पारोळा) येथे तर महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा कल्याणी देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. कार्यक्रमास संघटनेचे सर्व पदाधिकारींसह महिला व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांमार्फत कऱण्यात आले आहे.