राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा मिळतील-अजित पवार

0

24 प्राईम न्यूज 11 Mar 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीवारी करत गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करूनही आद्याप महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम आहे. महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागांसंदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादीची ३ ते ४ जागांवर बोळवण होईल, असे म्हटले जात आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी भूमिका मांडली. महायुतीतील जागावाटप सोमवारपर्यंत फायनल होईल, त्यात मित्रपक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, असे अजित पवार यांनी सांगितले. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कुणाला दमदाटी केली नसल्याचे म्हणत शरद पवार यांनी केलेले आरोपदेखील अजितदादांनी खोडून काढले. पान २पुण्यातील महापलिकेच्या कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत मी दिल्लीला जाणार आहे. यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी किती जागा मागितल्या हे मी जाहीर करणार नाही. आम्ही व्यवस्थितपणे जागा मागितल्या आहेत. जेवढ्या होत्या तितक्या मिळणार का, असे पत्रकारांनी विचारले असता, तिघांचा सन्मान राहील, सन्मानजनक जागावाटप होईल, असे उत्तर अजित पवार यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!