पिंप्री प्र ऊ येथे बालिकेवर अत्याचार

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील
पारोळा पिंप्री प्र ऊ (ता.पारोळा) येथे एका नऊ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याप्राकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार दिनांक नऊ मार्च रोजी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास पिंप्री प्र ऊ येथील विशाल नाना पाटील यांच्या शेतात नर्सरी शेडमध्ये आरोपी हिरालाल अमरसिंग बारेला रा शेनपाणी (ता.चोपडा) याने एका नऊ वर्षीय बालिकेवर अमानुषपणे अत्याचार केला, याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध आज पारोळा पोलिसात बलात्कार,पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बालिकेला धुळे येथे रवाना करण्यात आले आहे.