तालुक्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण जखमी..

पारोळा प्रतिनिधी/प्रतिनिधी
पारोळा – तालुक्यातील सार्वे गावाजवळ मोटर सायकल स्लीप होऊन दोन जण तर दळवेल गावाजवळ पादचाऱ्यास मागून अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
येथील महामार्गावरील सार्वें गावाजवळ दिनांक दहा रोजी दुपारी चारच्या सुमारास मोटरसायकल स्लीप होऊन त्यात रोहित भालेराव व अमोल सपकाळे दोघेही राहणार (जळगाव) हे जखमी झाले तर दळवेल गावाजवळ दिनांक दहा रोजी रात्री नऊच्या सुमारास समाधान पवार (३०) रा.मोंढाळे हे रस्त्याचा साइडपट्टीचा खाली पायी चालत असताना त्यांना मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यात ते जखमी झाले.या दोघेही झालेल्या अपघातात तीन जण जखमी होऊन त्यांना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचा रुग्णवाहिकेने पारोळा येथील कुटीर रूग्णालयात दाखल केले. याबाबत पोलिसांत उशिरापर्यंत कुठलीही नोंद नव्हती.