खा. राहुल गांधी यांचा दोंडाईचा शहरात मुक्काम. निश्चित.खा.राहूल गांधी यांच्या यात्रेचे स्वागत करून मोठ्या संख्येने उपस्थिती द्या-शामकांत सनेर.

दोंडाईचा प्रतिनिधी रईस शेख
शहरातून भारत जोडो न्याय यात्रेला प्रारंभ केला जाईल. इंडिया घटक पक्षातील सर्व पदाधिकारी सदस्यांनी खा. राहुल गांधी यांच्या यात्रेचे स्वागत करून मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी केले.
कार्यकर्त्यांना आवाहन संदर्भात आज दि १० मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली . भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबार मार्गे दोंडाईचा येथे दिनांक १२ तारखेला सकाळी साडेसात वाजता खा.राहुलजी गांधी यांचा रोड शो ची सुरुवात नंदुरबारला होऊन या यात्रेला खा. राहूल गांधी प्रारंभ करतील. नंदुरबार शहरांमध्ये रोडशो आणि एका जाहीर सभेच्या नंतर सदर यात्रा ही दोंडाईचाच्या दिशेला १२ मार्च रोजी येईल दुपारी ४-०० वाजेच्या सुमारास धुळे जिल्ह्यामधील पहिलं स्वागत हे दोंडाईचा नंदुरबार चौफुलीवर होईल. तदनंतर राजपथ मार्गे ध्यानचंद मेडिकल मार्गे ते आप्पासाहेब भावसार नगर मैदानावर पोहोचतील त्या ठिकाणी खा. राहुलजी गांधी आणि त्यांच्या समवेत येत असलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सर्व नेते यांचा या ठिकाणी मुक्काम असणार आहे.
गुजरात मधील सोनगड येथे यात्राच्या टप्पा संपून पुन्हा ती यात्रा १२ तारखेपासून पूर्ववत होईल आज सर्व कंटेनर्स आणि भारत जोडो यात्रेचे राहुल गांधींच्या सर्व बसेस या दोंडाईचे मुक्कामी पोहचल्या आहेत . त्यांच्या समवेत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते आहेत त्यांच्यामध्ये जयराम रमेश साहेब, कन्हैया कुमार, के सी वेणुगोपाल आहेत महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नथैला आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले विधिमंडळाचे नेते आ बाळासाहेब थोरात, महाराष्ट्राची विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील, माजी मंत्री नितीन राऊत,आ. सुनिल केदार,आ.यशोमती ठाकूर, आ अमित देशमुम, विश्वजीत कदम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि धुळे जिल्ह्याचे सुपुत्र आमदार कुणाल पाटील आमदार प्रणिती शिंदे, कार्याध्यक्ष नसीम खान दुसरे कार्याध्यक्ष खासदार चंद्रकांत हंडोरे आहेत महाराष्ट्रातील जेवढे काँग्रेसचे आणि विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य आणि सर्व माजी मंत्री हा संपूर्ण महाराष्ट्राचा ताफा हा नंदुरबार आणि धुळ्याकडे या दोन दिवसांमध्ये दाखल होईल. मुक्कामाच्या नंतर १३ मार्च रोजी सकाळी दोंडाईचा शहरातील निर्मल एम्पोरियम पासून दोंडाईचा शहरात रोडशोला सुरुवात होईल . छत्रपती शिवरायांच्या शिवाजी पुतळ्यापासून अभिवादन केल्यानंतर नगरपालिका मार्गे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला अभिवादन एकता चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला वंदन करून गोपालपुरा मार्गे कब्रस्तान मार्गे सरळ हायवेला यात्रा प्रस्थान करेल नंतर विखरण येथील मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या शेतकरी स्वर्गीय धर्मा पाटील यांच्या पत्नीला भेट घेणार आहेत. कामपुर मेथी मार्गे क्रांती स्मारकाला अभिवादन करून चिमठाणा आणि सोनगीरच्या दिशेला सदर यात्रा जाईल तालुक्यातील इंडियाच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी केले आहे.शिवसेनेचे( उबाठा )उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहुल माणिक आदी उपस्थित होते.