टोल नाका सुरु होण्यापूर्वीच कॕबिन जाळून तोडफोड

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील

पारोळा – राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ वर (जूना ६) सबगव्हाण खुर्द ता. पारोळा येथील टोल नाका सोमवारपासून सुरु होणार होता. मात्र त्यापूर्वीच अज्ञात पाच इसमांनी टोल नाक्याची कॕबिन जाळली,सदर घटना ही रविवारी मध्यरात्रीचा सुमारास घडली.
पारोळा तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.५३ चे काम जवळपास नव्वद टक्के पूर्ण झाले आहे.परंतु सर्विस रो, सुशोभीकरण,दूरध्वनी,ट्रीट लाईट, झाडे लावणे अशा विविध सुविधा व उपाय योजना अद्यापही बाकी आहेत.मात्र दिनांक ११ रोजी सकाळपासून टोल नाका सुरू होणार होता.परंतु त्या आधीच मध्यरात्री तीनच्या सुमारास धुळ्याकडून विना नंबर प्लेट असलेली एका चार चाकी वाहनातून पाच जणांनी चेहरा कपड्याने ढाकत टोल नाका गाठून लाईन क्रमांक एक चे लाकडी दांड्याचा साह्याने आधी कॅबिन फोडले,नंतर केबिनमध्ये स्फोटक पदार्थ फेकून आग लावली त्यानंतर यू टन मारून त्यांनी लाईन क्रमांक दहा ची कॅबिन जवळ देखील तोडफोड करत स्फोटक पदार्थ फेकून आग लावली तसेच टोल प्लाझा च्या ऑफिसला लावलेल्या काचाही फोडून धुळ्याच्या दिशेने रवाना झाले.दरम्यान,कॕबिन जाळणारे पाच ही अज्ञात इसम सिसीटीव्ही कॅमेरेत कैद झाले आहे.अज्ञात इसमांकडून टोलनाक्यातील बूथ क्रमांक एक व दहा येथे लावण्यात आलेले कंप्यूटर सीसीटीव्ही कॅमेरा,एसी केबल वायरिंग, सरोवर,ऑपरेटिंग सिस्टम साठी लागणारी सर्व मशिनरी जळाल्याने तब्बल एक ते दीड कोटी चे नुकसान झाल्याचे पारोळा पोलिसात दगडू सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुनील पवार व सहकारी यांनी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आढावा घेतला.
अज्ञात इसमांकडून टोल नाक्याची
नासधुस झाल्यामुळे दोन लेन चे मोठे नुकसान झाले आहे,येत्या दोन-तीन दिवसात संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर टोल सुरू केला जाईल.

गौतम दत्ता, जनरल मॅनेजर अग्रह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर…..