साध्वी प्रज्ञासिंगना वॉरंट जारी.

0

24 प्राईम न्यूज 12 Mar 2024.

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी डीभाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहणाऱ्या साध्वी यांच्याविरोधात विशेष एनआयए न्यायालयाने १० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

यात ७ जणांना आपले प्राण बॉम्बस्फोट गमवावे लागले. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना

२९ सप्टेंबर २००८ मालेगावमधील एका मशिदीत पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर अटक करण्यात आली होती. त्यापैकी अनेकजण सध्या जामिनावर बाहेर आहेत. हा खटला मुंबईतील विशेष एनआयएचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यासमोर नियमित सुरू आहे.

गेल्या आठवड्यात न्यायाधीश लाहोटी यांनी प्रज्ञासिंग यांना कारवाईचा इशारा दिला होता. सुनावणीला व्यक्तिशः हजर न राहिल्यास कारवाई करू, अशी सक्त ताकीद दिली होती. त्यानंतरही सोमवारी प्रज्ञासिंग गैरहजर राहिल्या. प्रज्ञासिंग यांच्या वकिलांनी वैद्यकीय कारणास्तव सूट द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज सादर केला; मात्र न्यायालयाने त्यांचा विनंती अर्ज फेटाळून लावत १० हजारांचा जामीनपात्र वॉरंट जारी केला.

या खटल्यात साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह एकूण १३ आरोपी असून, त्यातील ५ आरोपींची सुटका झाली आहे. प्रज्ञासिंग व अन्य सहा जणांविरोधात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) व भारतीय दंड संहितेच्या तरतुदींखाली खटला सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!