सर्व शाळांमधील शिक्षकांना ड्रेस कोडदीपक केसरकर यांची घोषणा.

24 प्राईम न्यूज 16 Mar 2024
राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना आता ड्रेस कोड लागू होणार आहे. सर्व व्यवस्थापनांच्या शाळामधील पुरुष आणि महिला शिक्षकांना शाळा निश्चित करेल, अशा रंगाचा एकच ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी येथे दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे. तसेच शिक्षकांच्या नावापुढे टीचर्सचा शॉर्टफॉर्म टीआर असा उल्लेख करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.