स्टार्टअप्सच्या माध्यमातून तरुणाईकडून रोजगार निर्मिती : स्मिताताई वाघ.

0

24 प्राईम न्यूज 24 Mar 2024

जळगाव : आजची तरुणाई स्टार्टअप्सच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून आपल्या जळगाव जिल्ह्याने देखील यात मोठी आघाडी घेतली आहे.आज जळगाव जिल्ह्यात ५० पेक्षा जास्त स्टार्टअप्स सुरु झाले असून ते यशस्वीरित्या वाटचाल करत आहेत. या स्टार्टअप्समुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. येणाऱ्या काळात हा वेग वाढेल, असा विश्वास माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली येथे स्टार्टअप महाकुंभ नुकतीच पार पडले. यात भारतभरातून तरुण-तरुणी सहभागी झाल्या होत्या. यात अमळनेर येथील स्टार्टअप डीआरटी फ्लाय प्रा.लि.चे संचालक रावसाहेब पाटील देखील सहभागी झाले होते. आज अमळनेर दौऱ्यावर असतांना स्मिता वाघ यांनी डीआरटी फ्लायच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी रावसाहेब पाटील यांनी श्रीमती वाघ यांचे स्वागत केले.

डीआरटी फ्लाय हे स्टार्टअप कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केसीआयआयएल या स्टार्टअप इन्क्यूबेशन सेंटरमधील रजिस्टर स्टार्टअप आहे. स्टार्टअप शाळा, महाविद्यालयांमध्ये ड्रोन, रोबोटिक्स टेक्नोलॉजीमध्ये अवेरनेस व ट्रेनिंग सेक्टरमध्ये काम करत असल्याची माहिती रावसाहेब पाटील यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी मुळे आज नवीन उद्योजकांना स्टार्टअप ला चालना मिळत आहे. आणि यातून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असल्याचे श्रीमती वाघ म्हणाल्या. यावेळी श्रीमती वाघ यांनी रावसाहेब पाटील व त्यांच्या टीमचे कौतूक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!