अमळनेरात होळी उत्साहात साजरी.. -शंभर वर्षाची परंपरा असलेला राज होळी चौक.


अमळनेर/प्रतिनिधी. राजहोळी चौक मित्रमंडळातर्फे दरवर्षी होळी हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. राजहोळी चौक मित्रमंडळला होळीचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शंभर वर्षाची परंपरा असलेल्या या राज होळी चौक मित्रमंडळातर्फे विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. होळीचा सण हा एका दिवसाचाअसला तरी मंडळातर्फे किमान आठ ते दहा दिवस विविध उपक्रम राबवले जातात. दररोज संध्याकाळी गल्लीतील लहान मोठी मंडळी एकत्र जमून भोजनाचा आस्वाद घेतात. यावर्षीही हा उत्सव साजरा करण्यात आला. रोज वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य देऊन आठ दिवस विविध उपक्रमांनी हा सण साजरा करण्यात आला. रविवारी रात्री होळी पेटवण्यात आली.ही होळी पेटल्यानंतर विस्तव घेऊन अन्यत्र होळी पेटवली जाते. यावेळी महेश कोठावदे, संदीप सराफ, सुजित सराफ, सुजित अमळकर, शैलेश भावे, प्रदीप पाटील, प्रशांत पाटील, योगेश जाधव, प्रशांत वाणी, योगेश येवले, महेश पवार, भाग्येश जोशी, शिरीष सैंदाणे, मनोहर चौक, रवी उपासनी, प्रदीप वाघ, सागर पाटील, विनोद पाटील हजर होते.
