रशियात दहशतवादी हल्ला. -११ संशयित ताब्यात; ‘इस्लामिक स्टेट’ने जबाबदारी स्वीकारली.


24 प्राईम न्यूज 24 Mar 2024. मॉस्को निवडणुका पार पडून आठवडाही उलटत नाहीं तोच रशियावर शुक्रवारी रात्री भीषण दहशतवादी हल्ला झाला. रशियाचे राजधानीचे शहर मॉस्कोत झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात जवळपास १३० नागरिक ठार, तर १५०हून अधिक जण जखमी झाले. इसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आतापर्यंतचा रशियातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मॉस्कोमधील एका हॉलमध्ये हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम् सुरू असताना अचानकपणे आलेल्या बंदुकधारी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करीत नागरिकांना लक्ष्य केले. गोळीबारासह दहशतवाद्यांनी बॉम्ब, ग्रेनेड आदींचाही वापर केल्याची माहितीआहे. काही वेळ येथे अंदाधुंद गोळीबार करून दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. रशिया मुस्लिमांवर अत्याचार करीत असल्याचे कारण पुढे करीत इसिसने येथे हल्ला केल्याचे म्हटले आहे, मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी याप्रकरणी जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे
