वंचितचा मविआला २६ मार्चचा अल्टिमेटम. -प्रकाश आंबेडकर.


24 प्राईम न्यूज 24 Mar 2024. महाविकास आघाडीत लोकसभेच्या१५ जागांवरून वाद सुरूआहे. त्यामुळे महाविकासआघाडीचे भांडण जर मिटत नसेल तर आम्ही त्यांच्यामध्ये कुठे शिरायचे ? त्यांचा तिढा सुटला की नाही याबाबतआम्हाला माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचा तिढा मिटणार नसेल तर आम्ही त्यांच्यामध्ये जाऊन तरी काय उपयोग, असे सवाल करीत आम्ही फक्त २६ मार्चपर्यंत थांबणार आहोत. त्यानंतर जी काही भूमिका असेल ती आम्ही स्पष्ट करू, असा अल्टिमेटम वंचित बहजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी महावि कास आघाडीला दिला आहे.
शिवसेनेने आघाडीसाठी महाविकास आघाडीला प्राधान्य दिले.यामुळे वंचितची शिवसेनेसोबतची युती आता राहिलेली नाही. महाविकास आघाडीसोबत जमले तर आघाडी म्हणून एकत्र राहू, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याशी युती करताना आधी आपण एकत्र बसून रणनीती ठरवून नंतर आघाडीसोबत जावे, अशी चर्चा झाली होती, मात्र तसे झाले नाही, अशी खंतही आंबेडकर यांनी व्यक्त केली प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षमल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून ७ जागांवर पाठिंबादेण्याची तयारी दर्शवली होती. या पत्रात आंबेडकर यांनीशिवसेना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीलराष्ट्रवादी काँग्रेसबद्दल तक्रार करताना त्यांनी विश्वास गमावल्याचा आरोप केला होता. या पत्रामुळे महाविकासआघाडीतील वंचितच्या सहभागाविषयीची शक्यता संपुष्टातआली होती. आता आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला २६ मार्चचा अल्टिमेटम दिल्याने वंचित स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
