भाजपांतर्गत रक्षा खडसेंना विरोध. – ऐनवेळी भाजप उमेदवार बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून चर्चा


24 प्राईम न्यूज 24 Mar 2024. रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे यांची उमेदवारी गृहीत धरून विरोध असतांनाही भाजपने खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली. मात्र आता एकनाथ खडसे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने रक्षा खडसे यांना बदलण्यासाठी भाजपच्याच वरीष्ठांकडून दबाव टाकला जात आहे.
खडसें सोबत छत्तीसचा आकडा असतांनाही आपण विरोध बाजूला ठवेत रक्षा खडसे यांचे नाव सुचविल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले. आता भाजपांतर्गत रक्षा यांना विरोध वाढू लागल्याने ऐनवेळी भाजप उमेदवार बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. भाजपकडून यंदा जळगावच्या दोन्ही मतदारसंघातील विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्याचा इरादा होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने काहीदिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या रावेर मतदारसंघातील उमेदवारीचे संकेत दिल्याने खडसे कुटुंबातच सासरे विरूध्द सून अशी लढत देण्यासाठी भाजपकडून डाव आखण्यात आल्याचे बोलले जाते त्यामुळेच रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारीबहाल करण्यातआली. मात्र रक्षा खडसेयांची उमेदवारी जाहीरहोताच एकनाथ खडसेयांनी प्रकृती कारणास्तव निवडणूकलढणे अशक्य असल्याचे जाहीरकेले खडसे यांना शह देण्यासाठीचभाजपकडून रक्षा खडसे यांनाउमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जाते एकनाथ खडसे यांनीच माघार घेतल्याने भाजपकडून रक्षा खडसे यांच्या नावाला विरोध होऊ लागला आहे या विरोधकांची भाजप पदाधिकारी समजूत काढतात की रक्षा यांच्या उमेदवारीचा फेरविचार करतात हे आगामी काळात समजेलच.
