होळीच्याच दिवशी घराची होळी. गॅस सिलेंडरचा स्फोट.

अमळनेर /प्रतिनिधी.

आग लागून गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. घरातील यात कर्त्या पुरुषाचा होरपळून मृत्यू झाला. ही दिलीप पाटील दुर्दैवी घटना पिंपळी (ता. अमळनेर) येथे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. दिलीप नामदेव पाटील, असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी दिलीप पाटील यांच्या पत्नी संगीता दिवा लावत असतानाच घरात अचानक आग लागली अन् त्यातच गॅस सिलिंडरचा स्फोटही झाला. घराचे लाकडी छतआणि कापूस यामुळे आग पसरली दिलीप पाटील यांच्या पत्नी, मुलगा विकी आणि नात खुशी तातडीने घराबाहेर पळाले. मात्र दिलीप यांना चक्कर आल्याने ते घरात अडकून पडले. ग्रामस्थ मिळेल त्या साधनांनी आग आटोक्यात आणून दिलीप पाटील यांना वाचवण्याचा प्रयत्ना करीत होते. बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत त्यांचा होरपळून मृत्यू झाला होता.
