शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जोड व्यवसायाची कास धरा… महिला मेळाव्यात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे आवाहन..

0

अमळनेर(प्रतिनिधि)

शेतीसाठी लागणार खर्च वाढला परंतु उत्पन्न कमी झाले. त्यामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी शेतीसोबतच जोड व्यवसाय करावा असे आवाहन पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी केले.
अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था व कृषी विभाग ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्टीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवानिम्मत रविवार दि. २२ रोजी श्री मंगळग्रह मंदिराच्या प्रसादालयात महिला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या प्रमुख मार्गदर्शिका पद्मश्री राहीबाई पोपेरे होत्या .प्रमुख पाहुणे जिल्हा कृषी अधिकारी प्रा. संभाजी ठाकूर, सुखदेव भोसले, आहार तज्ञ डॉ. अनिल पाटील, डॉ. अपर्णा मुठे, प्रा. वसुंधरा लांडगे, गायत्री म्हस्के, अनिल भोकरे, संस्थेचे ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे खजिनदार गिरीश कुलकर्णी, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्थ जयश्री साबे ,दादाराम जाधव आदी उपस्थित होते.
पद्मश्री राहीबाई म्हणाल्या की, आदिवासी समाजाने खऱ्या अर्थाने संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. रानभाज्या व पारंपरिक धान्य संस्कृती टिकून आहे. आजही आदिवासी भागातील नागरिक एक ते दीड किलो मीटर अंतराहून डोक्यावरून पाणी आणून निरोगीजीवन जगत आहे. पुढची पिढी निरोगी व सुदृढ राहण्यासाठी आतापासून व
*मला मातीमुळेच पुरस्कार*
लहान वयातच डोक्यावरून मातृछत्र हरपले वडिलांनी आम्हा सात बहिणींचा सांभाळ केला घरची परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने दोन बहिणी क्षिशित झाले तर चार बहिणी अक्षिशित राहिल्या वडिलांच्या संस्काराची शिदोरी सोबत असल्याने आज तुमच्यासमोर मार्गदर्शन करू शकले. गरिबीमुळे शाळॆत गेली नाही, पण कृषी पदवी घेणारे महाविद्यालयीन तरुणांना आज मार्गदर्शन करते. पद्मश्री पुरस्कारासह अनेक पुरस्कार मला केवळ काळ्या मातीमुळे मिळाली आहे. प्रत्येक गावातील महिलेने पारंपरिक पद्धतीने देशी वाणांना जतन करावे.
*माहेरी आल्यासारखं वाटलं*
रेती माती व शेतीचे आराध्य दैवत असलेल्या मंगळ देवाच्या दर्शनाने भारावून गेली आहे. आजवर अनेक ठिकाणी जाऊन महिलांना मार्गदर्शन केले. परंतु आज कार्यक्रमात नारी शक्तीचा प्रचंड उत्साह दिसला ही बाब कौतुकास्पद आहे. मंदिराचा परिसर पाहून माझ्या माहेरीच आल्यासारख वाटलं असेही पद्मश्री पोपरे म्हणाल्या.
सूत्रसंचालन योगेश पवार यांनी केले. दिपक चौधरी यांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!