शाळेला आईचे नाव देऊन मातेचे ऋण फेडणाऱ्या सुपुत्राने एक आदर्श निर्माण केला आहे..—.
असे प्रतिपादन आ.अनिल पाटील..

0


अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर येथिल बहादरपुर रस्त्यालगत असलेल्या शाळेला श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी आपल्या आईचे नावं देत भव्य नामकरण समारंभ आयोजित केला होता यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलतांना आ.अनिल पाटील यांनी सांगितले की,काही काळातच अनेक आदर्श अश्या शैक्षणिक संस्थांचे काम उभारून परिसराचा कायापालट करण्यास व तालुक्यातील संस्था सांभाळण्यास समर्थ असल्याचे अशोक पाटील यांनी सिद्ध केले आहे.यावेळी प्रमुख वक्ते प्रा.अशोक पवार यांनी याप्रसंगी सांगितले की, गोरगरीब कष्टकरी मुलांना आधुनिक सोयी सुविधांसह मोफत शिक्षण देण्याचे उत्कृष्ट कार्य सौ विमलबाई आधार पाटील प्राथमिक विद्या मंदिर च्या माध्यमातून सुरू आहे. यावेळी श्री.आधार सुकदेव पाटील व सौ.विमलबाई आधार पाटील यांचे हस्ते आ.अनिल पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत नामकरण कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.सरस्वती विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य सादर केले तर सौ.विमलबाई पाटील शाळेचे विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.


‘स्वतः जे कष्ट भोगले ते माझ्या परिसरातील जनतेच्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून सेवाभावीवृत्तीने काम करतोय’ असे प्रास्ताविक अध्यक्ष अशोक पाटील यांनी केले. सूत्रसंचलन मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी केले.याप्रसंगी मंचावर प्रा.अशोक पवार, जिल्हा बँकेचे मा.संचालिका सौ.तिलोत्तमा पाटील, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील,संचालक किसन पाटील,अरुण भावसार, विजय जैन,सचिव सौ.योगिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.तर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत व सर्व पत्रकार बंधू यांचेसह उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव,शालेय पोषण अधिक्षक भुपेंद्र बाविस्कर, माळी समाज अध्यक्ष मनोहर महाजन,राज्य ग्रंथालय समिती सदस्या सौ रिता बाविस्कर, मा.उपनगराध्यक्ष पांडुरंग महाजन यांचेसह अमळनेर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक ग्रा प सरपंच व सदस्य यांचेसह विद्यार्थी पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे कार्याध्यक्ष समाधान शेलार, मुख्याध्यापक आशिष पवार, उपाध्यक्ष भिमराव पाटील, संचालक दिलीप पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!