एरंडोल ते ताडे रस्त्याची दुर्दशा कधी संपणार…..

एरंडोल (प्रतिनिधि) येथून उत्राण रस्ता ताड्या पर्यंत सुमारे १४ किलोमीटर अंतराचा असून ठीक ठिकाणी रस्त्यावर खड्डे अशी दैनावस्था राहिली नसून रस्ता खड्ड्यात गेल्याचे दिसून येते. याबाबत वाहन चालक व प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
डॉक्टर वाडी पासून शेंड्या पिंपळापर्यंत ४ किलोमीटर अंतराचा रस्त्याची पूर्ती वाट लागली आहे. अंजनी कालव्यापासून दक्षिण मुखी हनुमान टेकडी पर्यंत रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे. अशा या खड्ड्यात गेलेल्या रस्त्यावरून वाहन चालवणे तारेवरची कसरत ठरत आहे. तरी या रस्त्याची त्वरित दुरुस्ती व्हावी व या रस्त्याला लवकरात लवकर अच्छे दिन यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या रस्त्यावर उत्राण येथील लिंबू वर प्रक्रिया करणारा कारखाना असल्यामुळे मोठ्या वाहनांची वर्धन नेहमी असते.. तसेच गिरणा काठावरील उत्राण पासून हनुमंत खेडे सिम, भातखेडे, पिंपरी सिम, ताडे, निपाणे या परिसरातील ग्रामस्थांना एरंडोल येथे तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी यावे लागते. रस्त्याच्या दैनाअवस्थेमुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल होतात.