एरंडोल येथे रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद, १८४ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

एरंडोल(प्रतिनिधि) येथील विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा व माधवराव गोळवलकर रक्तपेढी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी २२ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेपासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात १८४ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावला.
डॉक्टर मकरंद वैद्य, डॉक्टर दीपक पाटील, डॉक्टर अर्जुन सिंग राठोड, मधुकर सैंदाणे, जागृती लोहार, बापूसाहेब राऊत लक्ष्मीकांत त्रिपाठी, दीपक व्हनभोज, सौरभ राऊत , रामचंद्र पोद्दार, प्रभाकर पाटील, गिरीश खोंडे व विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा एरंडोल येथील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.