अमळनेर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नानासाहेब विनोद लांबोळे यांनी “हटविल्या प्रभाग.क्र १७ येथील रामेश्वर नगरमधील धोकेदायक विजतारा”…

0

अमळनेर : गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर वाजंत्रीच्या तालावर एकमेकांच्या खांद्यावर बसून नाचणाऱ्या १२ वर्षीय बालकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झालेला होता. ही घटना दिनांक 8 सप्टेंबर 2022 गुरुवारी रोजी सायंकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास प्रभाग क्र.१७ येथील रामेश्वर नगरमध्ये घडलेली होती. यात कुणाल ऊर्फ जय समाधान मराठे (वय वर्ष 12) या बालकाचा दुःखद मृत्यू झालेला होता. रामेश्वर नगरमधील गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूकीत गुरुवारी सायंकाळी हनुमान नगरकडे निघाली होती. मिरवणूक या भागातून गेल्यावर या भागातील जय मराठे व मनदीप अनिल परदेशी ( वय वर्ष १२) ही बालके एकमेकांच्या खांद्यावर बसून आणि हातात स्टीलचा झेंडा घेऊन नाचत होती. अचानक वीज तारांच्या स्पर्श झाल्याने दोघे मुले खाली पडली. सदर घटनेत जय मराठे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर मनदीपला तोंडाला मार लागला. सदर दुर्देवी घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली होती.
या घटनेची नोंद गांभीर्याने घेत अमळनेर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नानासाहेब विनोद रामचंद्र लांबोळे उर्फ बिजूनाना यांनी सदरची घटना भविष्यात पुन्हा घडू नये यासाठी काळजी घेत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री प्रशांत सरोदे व वीज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करून सदर भागातील धोकादायक विजतारा कायमस्वरूपी हटवण्यासाठी पाठपुरावा केलेला होता. *बिजू नानांच्या पाठपुराव्याला यश आज दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी आले असून सदर भागातील धोकेदायक विजतारा कायमस्वरूपी काढून पर्यायी जागी विद्युतखांबे तसेच विजतारा उभारण्याचे काम पूर्णत्वास आले. यामुळे परिसरातील नागरिकांना आपल्या जीवाचा धोका निघून गेल्याने सुखरूपतेची व आनंदाची भावना मनात निर्माण झाली. सदर कामासाठी नानासाहेब विनोद लांबोळे यांनी नगरपालिकेत ठराव तयार करून त्या ठरावास मुख्याधिकारी श्री.प्रशांत सरोदे यांनी विशेष मंजूरी दिल्याबद्दल नागरिकांनी दोघांचे विशेष आभार मानले.
सदर प्रसंगी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी ,नानासाहेब विनोद लांबोळे मयत जय मराठेचे पालक समाधान मराठे व सुनीता मराठे त्याचप्रमाणे परिसरातील महिला व पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!