जेसीबी बोरोलो अपघात 5 जखमी..

अमळनेर (प्रतिनिधि)पारोळा रोडवरील रत्नपिंप्रीजवळ जेसीबीचा एक्सल तुटल्याने वाहनात बसलेले हेमराज जाधव, रुक्माबाई जाधव, तनु जाधव, काजल जाधव, किशोर जाधव, सर्व रा. दाजिबा नगर हे एकाच कुटुंबातील असून हे सर्व जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला, सर्वांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, जेसीबी चालक हरियाणातील निसार जमील अहमद याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, पंचनामा पारोळा पोलीस हेड. कॉ विनोद साळी, कॉ हेमचंद्र साबे, राहुल पाटील यांनी केला.