**विचारांचे संतुलन बिघडल्याने मन आणि बुद्धीचा अपघात होऊन रस्त्यावर वाहनाचा अपघात होऊ नये म्हणून चालकाने मन शांत ठेवावे – ब्रह्मकुमारी पुष्पा दिदी —–

एरंडोल(प्रतिनिधि) चालकाने आपलं मन नेहमी शांत ठेवावे आपले विचार सात्विक आणि नेहमीच सकारात्मक ठेवावे नदीच्या पाण्याला ज्या पद्धतीने बंधारा बांधतात त्या पद्धतीने आपल्या नकारात्मक व चंचल विचारणा ध्यान व राजयोगाचा बंधारा बांधावा मन व बुद्धीचा अपघात होऊन रस्त्यावर वाहनांचे अपघात होत असतात म्हणून मन नेहमीच शांत ठेवावे असे आवाहन प्रजापिता ब्रमकुमारी विश्वविद्यालयाच्या प्रमुख पुष्पा दीदी यांनी रस्ता सुरक्षितता अभियानाच्या अंतर्गत आयोजित कार्यक्रम प्रसंगी उपस्थित चालकांना केले यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार प्रमुख विजय पाटील होते तर व्यासपिठावर सविता बहन, संभाजी इंगळेसर ,प्रकाश लाठी,गोविंदा बागुल ,श्रीमती भारती बागले ,लेखकार चौधरी। उपस्थित होते सुरवातीला उपस्थित मान्यवरांचे आगाराच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी सविता बहन यांनी मनोगतातुन वेळेचं महत्व सांगत प्रत्येक कर्मचारी बांधवानी व्यसनापासून दूर राहत एस टी चा चालक हा पन्नास लोकांना घेऊन प्रवास करीत नसतो तर पन्नास कुटुंबांची जबाबदारी त्याचेवर असते याची जाणीव करून दिली प्रमुख अतिथी व सामाजिक कार्यकर्ते संभाजी इंगळे सर यांनी काम,क्रोध ,लोभ ,मोह ,मत्सर या विकारांपासून दूर राहण्याचे सांगत प्रत्येक चालकाने मनाची भाषा ओळखावी कारण मनाची भाषा ही प्रेमळ असते असे सांगत स्थिरभाव,साक्षीभाव व प्रेमभाव ठेवून ध्यान योग करीत जीवन जगावे असे सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय पाटिल यांनी देखील कर्मचारी बांधवानी व्यसनापासून दूर राहत प्रत्येकाने आयुष्यात आरोग्याकडे अधिकचे लक्ष देऊन मनाचा देखील विकास केला पाहिजे असे सांगत ध्यानधारणा ,योगा व सकारात्मक विचार व यशस्वी जीवन यावर येणाऱ्या काळात मोठा कार्यक्रम एस टी कर्मचारी यांच्या करिता ठेवणार असल्याचा मानस व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक ,सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वाहक किशोर मोराणकर यांनी केले यावेळी कर्मचारी बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते**