मोठ्या भावाची पत्नी ही आईसमान असते !खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान..

0

24 प्राईम न्यूज 1 Apr 2024

मोठ्या भावाची बायको म्हणजेच मोठी वहिनी ही आईसमान असते, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी केले. त्यांनी माध्यमांना सांगितले की, भाजपचे नेते बारामतीत येऊन म्हणतात की आम्हाला या निवडणुकीत शरद पवारांना हरवायचे आहे. त्यांना विकास नाही करायचा. त्यांच्याकडे उमेदवारही नाही. आमचे घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी लागते. आमची माऊली, मोठी वहिनी ही आईसमान असते. माझ्यावर जे संस्कार आहेत त्यानुसार मोठ्या भावाची पत्नी आईसमान असते. आमच्या आईला भाजपने निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे, याचा विचार करा, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!