अमळनेर शहरातील विविध असोसीएशन व संघटना यांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.


अमळनेर/ प्रतिनिधी. दिनांक 31-03-2024 दुपारी 5.00 वा. मिटींग हॉल नगरपरिषद अमळनेर येथे 03 जळगाव लोकसभा मतदार संघातर्गत 015 अमळनेर विधानसभा मतदार संघाच्या अमळनेर शहरातील विविध असोसीएशन व संघटना यांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीत सर्व संघटना यांनी 100% मतदान करावे व आपल्या संघटनांचे पदाधिकारी, त्यांचा परिवार यांना देखील मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे असे आवाहन करण्यात आले. सर्व उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात आली. सदर बैठकीस रुपेशकुमार सुराणा, तहसिलदार अमळनेर, प्रशांत धमके निवडणूक नायब तहसिलदार, तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
