अमळनेर शहरातील सर्व बचत गटाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बैठक महादेव खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली खाली संपन्न.

0


अंमळनेर /प्रतिनिधी. दिनांक 31-03-2024 दुपारी 4.00 वा. मिटींग हॉल नगरपरिषद अमळनेर येथे अमळनेर विधानसभा मतदार संघातर्गत अमळनेर शहरातील सर्व बचत गटाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बैठक सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीत सर्व बचत गटातील सर्व सदस्यांनी 100% मतदान करावे व आपल्या बचत गट भागातील महिलांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे असे आवाहन करण्यात आले. सर्व उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात आली. सदर बैठकीस रुपेशकुमार सुराणा, तहसिलदार अमळनेर, प्रशांत धमके निवडणूक नायब तहसिलदार, तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!