लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसंग्रामची बैठक संपन्न !गेल्या १० वर्षातील खासदार सुभाष भामरेंची निष्क्रियता विविध माध्यमांतून जनतेसमोर मांडणार !लोकसंग्रामची भूमिका कुठल्याही व्यक्ती वा पक्षाविरुद्ध नसून “भामट्या” प्रवृत्ती विरुद्ध !

0

धुळे/प्रतिनिधि. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसंग्रामची भूमिका ठरविण्यासाठी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्री अनिल अण्णा गोटे यांनी व्यापक बैठक आयजित केली होती. सदर बैठकीस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

गेल्या १० वर्षात धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेने भाजपा खासदार सुभाष भामरे यांना भरभरून मते दिली. मनमाड-धुळे-इंदौर या रेल्वेमार्गाचा जिव्हाळ्याचा प्रश्न असो, धुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, दर्जेदार रस्त्यांच्या कामाचा प्रश्न असो, या व इतर सर्वच प्रमुख प्रश्नांवर खासदार सुभाष भामरे पूर्णतः अपयशी ठरले आहेत. लोकसभा मतदार संघातील जनतेला बोरविहिर-नरडाणा रेल्वे मार्ग हा मनमाड-इंदौर रेल्वेमार्गाचाच एक भाग असल्याचे धादांत खोटे सांगत आहेत. धुळे शहराला जवळ-जवळ प्रत्येक आठवड्यात श्री.भामरे हे रोज पाणी देण्याच्या घोषणा करीत आहेत, विशेष म्हणजे, काही भागात आठ-आठ, दहा-दहा दिवस पाणी येत नाही. असे असतांनाही ते पुन्हा-पुन्हा रोज पाणी देण्याच्या घोषणा करण्याचे धाडस करीत आहेत. रस्त्यांची कामे तर इतकी निष्कृष्ट दर्जाची होत आहेत की, सिमेंटचे रस्ते अक्षरशः महिन्याभराच्या आत खराब होत आहेत. आश्चर्य म्हणजे, सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर डांबर टाकण्याचा विक्रम देखील त्यांच्याच नेतृत्वाखाली धुळे मनपाने केलेला आहे त्याबद्दल मात्र श्री. भामरे एक शब्दही बोलले नाहीत. त्यामुळे यांचा नाकर्तेपणा जनतेसमोर येण्यासाठी अनिल अण्णांनी लोकसभा निवडणुक लढवावी अशी भुमिका सोमनाथ चौधरी, प्रकाश जाधव, सौ. सुरेखा नांद्रे, मांगिलाल सरग, अलोक रघुवंशी, अनिल पाटील, अकबर सर, विजय वाघ, प्रशांत भदाणे आदी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली आहे.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना अनिल अण्णा गोटे म्हणाले ‘धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेने खासदार डॉ. भामरे यांना दोन वेळा प्रचंड मतांनी निवडुन दिले आहे. परंतु, डॉ. भामरे यांनी मतदारसंघातील जनतेची घोर फसवणुक केली आहे, निराशा केली आहे. २०१९ ला दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद मोदींच्या हस्ते बोरविहिर नरडाणा या रेल्वे मार्गाचे भूमिपुजन असल्याचे शासकीय कार्यक्रमात नोंद असतांनाही भामरे महाशय मात्र, माननीय पंतप्रधानांनी मनमाड-इंदौर रेल्वे मार्गाचेच भूमिपुजन केले असे धांदात खोटे जनतेला सांगत आहेत. जर बोरविहिर-नरडाणा हा मनमाड-इंदौर चा भाग निघाला तर, आपण राजकारणात वाटेल ती किंमत मोजण्यास तयार आहोत असे यावेळी अनिल अण्णा गोटे यांनी म्हटले.

आपली भूमिका ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरूध्द नसून विशिष्ट समाज विघातक प्रवृत्तीच्या विरूध्द आहे. धांदात खोटे बोलणे, शहरातील व मतदारसंघातील गुंडगिरीला व भ्रष्टाचाराला राजमान्यता देणे, हे कमी म्हणून की काय गुन्हेगारांच्या “राजा” लाच पक्षात घेणे, निकृष्ट दर्जाचे कामे करणे, धुळेकरांना पिण्याच्या पाण्यापासून १०-१०, १५-१५ दिवस वंचित ठेवणे, धुळेकरांच्या माथ्यावर तब्बल १० पट घरपट्टी वाढीचा बोजा लादणे, १५३ कोटी रूपयांची, अवघ्या २० दिवसात १७३ कोटी रूपयांची झालेल्या अक्कलपाडा धुळे पाईपलाईनच्या योजनेद्वारे पाणी लिप्ट करावे लागणार असून व त्यासाठी महानगरपालिकेने ५ मोटारी बसूनही सदर पाणी नैसर्गिक उताराने येणार असल्याचेखोटे सांगणे, भुयारी गटार योजना अपुर्ण अवस्थेत सोडणे अशा निष्क्रीय आणि निगरगट्ठ, ‘भामट्या’ प्रवृत्तीच्या विरोधात आपली भूमिका आहे.

जर आपली आर्थिक परिस्थिती असती तर, आपण लोकसभा निवडणुक जरूर लढविली असती. परंतु, कार्यकर्त्यांच्या भावनांशी सहमत असुनही आपण लोकसभा निवडणुक न लढविता धुळेकर जनतेला विविध माध्यमांद्वारे वस्तुस्थितीची जाणीव करून देणार आहोत, असे आपले मनोगत संपवितांना अनिल अण्णा गोटे यांनी सांगितले असल्याचे पत्रक लोकसंग्रामचे प्रसिध्दी प्रमुख श्री. अविनाश लोकरे यांनी आज प्रसिध्दीस दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!