अमळनेर येथे मॅरेथॉन स्पर्धेत रामदास वडर व मनीषा गावित प्रथम.


अमळनेर/प्रतिनिधी. अमळनेर महसूल विभागातर्फे आयोजित मतदार जागृती मॅरेथॉन स्पर्धेत पुरुषांमध्ये रामदास वडर यांनी तर महिला गटात मनीषा गावितने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. १०१ वर्षाच्या मतदार आटाळे येथील लाडकाबाई रामचंद्र अहिरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
२ एप्रिल रोजी जिल्हा परिषद विश्रामगृह ते धुळे रोडवरील अमळनेर प्रवेशद्वारपर्यंत स्पर्धेचे आयोजन करण्यात केले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलिस निरीक्षक विकास देवरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, जेष्ठ मतदार वसंतराव पाटील, पुरवठा निरीक्षक संतोष बावणे हजर होते.स्पर्धा यशस्वीतेसाठी पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, सिद्धांत शिसोदे, अमोल पाटील, नपा मुकादम नितीन बिन्हाडे तसेच महेंद्र पाटील, जयवंत ढवळे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन आभार संजय पाटील यांनी मानले.
