घर फोडून ८७ हजाराच्या दागिन्यांसह मुद्देमाल चोरून चोरटे पसार.

0

अमळनेर/प्रतिनिधी. अमळनेर पाडळसरे (ता. अमळनेर) येथे भरदिवसा घर फोडून ८७ हजारांच्या दागिन्यांसह मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. ही घटना ३१ रोजी घडली. या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे.

३१ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५:३० दरम्यान पाडळसरे येथील शेतकरी जुगल राजेंद्र पाटील यांच्या घरात कुणी नसताना अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोंडा तोडून लाकडी कपाटातून दागिने लांबविले. ६० हजार रुपये किमतीचे दागिने व २७ हजार रुपये रोख असा एकूण ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

याप्रकरणी मारवड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पीएसआय विनोद पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!