जळगावचे नाराज भाजप खासदार ■ उन्मेष पाटील आज ठाकरे गटात प्रवेश करून मैदानात उतरणार?


24 प्राईम न्यूज 3 Apr 2024. उन्मेश पाटील भाजप खासदार थेट मातोश्रीवर, ठाकरे गटात प्रवेश करुन मैदानात उतरणार?
तिकीट कापलेले भाजप खासदार उन्मेश पाटील थेट मातोश्रीवर पोहोचले आहेत. उन्मेश पाटील यांनी आधी संजय राऊतांची भेट घेतली त्यानंतर आता ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला जोर आल्याचं दिसत आहे. निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, त्यातच विविध पक्षांमधील इनकमिंग आणि आऊटगोईंग देखील जोरात सुरु आहे. आता भाजपचा विद्यमान खासदार उन्मेश पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. जळगावचे भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी मंगळवारी आधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भाजप खासदार थेट मातोश्रीवर पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
