‘एप्रिल फूल’ची ओळख ही आपल्याकडे ‘अच्छे दिन’ची. -आदित्य ठाकरे.


24 प्राईम न्यूज 3 Apr2024
देशात सध्या परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या ४० गद्दार यांनी आता विचार करायला हवा. कारण, आता चित्र स्पष्ट होत आहे. जनता आमच्या बाजूने आहे. लोकांनी यांना नाकारले आहे. भाजपचीही अशीच स्थिती आहे. नुकताच एप्रिल फूल डे झाला. जगात काही देशांमध्ये त्याला एप्रिल फूल म्हणून ओळखतात, पण आपल्या देशात त्याला अच्छे दिन म्हणून संबोधले जाते, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारला लगावला.
ते म्हणाले की, दिल्ली, बिहार, झारखंड, महाराष्ट्रात तुम्हाला दिसेल की, इंडिया आघाडीची बांधणी मजबूत आहे. काही महिने, काही दिवसांपूर्वी जे यांच्याविरोधात बोलत होते, त्याने गद्दारी केली. आता कोण-कोणत्या पत्रात आहे, सगळ्यांना माहीत आहे, सगळ्यांना दिसतेय. बंडखोरी आणि गद्दारांमध्ये खूप फरत असतो. ४० गद्दार होते, त्यांचे पुढचे काय याचा विचार करावा. आता पुढचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिथे-तिथे गद्दारी झाली, तिथे टव लोकांनी नाकारले आहे. गेल्या १० वर्षांत भाजपाने केंद्रात आणि राज्यात जी कामे करायला पाहिजे होती, ती केली नाहीत. सरकारने जी आश्वासने दिली होती, ती अपूर्ण आहेत, असे ते म्हणाले.
