अमळनेर येथील लोकमान्य नवीन मराठी शाळा पहिली चा विद्यार्थी महंमद मोईन खान कॉम्प्युटर ओलिंपेट परीक्षेत राज्यात 6 व्या क्रमांकाने उत्तीर्ण. -महंमद मोईन खान याला गोल्ड मेडल व इस्कॉलरशिप जाहीर.

अमळनेर/प्रतिनिधी

इ 1लीचा विद्यार्थी मोईनखान अमजदखान पठाण हा राज्यात 6 व्या रँक ने पास झाला तर इ 2री मधील विद्यार्थीनी भूमिका राहुल बागुल ही राज्यात 13व्या रँक ने उत्तीर्ण झाले त्यात विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व स्कॉलरशिप जाहिर झाले शाळेचे एकूण 69 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यापैकी राज्यात पहिल्या 100 रँक मध्ये 62 विद्यार्थी तर 100 ते 150 रँकमध्ये 5 विद्यार्थी उत्तीर्ण झाले एकूण निकाल 99℅लागला.या स्पर्धा परीक्षेत 1 ली ला सौ रुपाली अभिषेक पांडे व इ 2 ला मकरंद रमेश निळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री मच्छिंद्र हिलाल मोरे सर यांनी मार्गदर्शन लाभले पहिलीचा विद्यार्थी मोईनखान हा अमळनेर येथील एडवोकेट अमजद खान यांच चिरंजीव आहे.
